एसबीआयचा इशारा, या चुका केल्यास खाते होईल रिकामे

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना चांगल्या बँकिंग सुविधा देण्यासाठी अनेक पाऊले उचलत आहे. एसबीआय सोशल मीडियावरून ग्राहकांना बँकिंग फसवणुकीपासून वाचण्यासाठी देखील अलर्ट करत आहे. एसबीआयने ट्विट करत पुन्हा एकदा ग्राहकांना सावधान केले आहे.

एसबीआयने ट्विट करत सांगितले की, वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे ग्राहकांनी सावधान राहण्याची गरज आहे. एटीएम कार्डची माहिती आणि पिनद्वारे पैसे चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे बँकेने आपल्या ग्राहकांना एटीएम कार्ड आणि पिन सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे.

बँक अकाउंटची माहिती फोनमध्ये सेव्ह करू नका –

बँकेने आपल्या ग्राहकांना सुचीत केले आहे की, बँक अकाउंट अथवा ऑनलाईन बँकिंगची माहिती फोनमध्ये सेव्ह करू नये. बँक अकाउंट नंबर, पासवर्ड, एटीएम कार्ड नंबर अथवा याचे फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवल्याने माहिती लीक होऊ शकते.

कार्डची माहिती शेअर करू नका –

एटीएमचा वापर स्वतःच करावा. कार्डची माहिती कोणालाच शेअर करू नये. असे केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते.

पिन शेअर करू नका –

कधीच कोणाला ओटीपी, पिन नंबर, डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा सीव्हीव्ही नंबर सांगू नये. बँकेनुसार, अनेक फसवणुकीच्या घटना यामुळेच घडतात. फोनवर बँकेच्या नावाने अनेक कॉल येतात. अशा कॉलपासून सावधान रहावे.

बँक कधीच मागत नाही माहिती –

बँकेने स्पष्ट केले आहे की, बँक आपल्या ग्राहकांकडून कधीच यूजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, व्हीपीआय (यूपीआय) सारखी माहिती मागत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी व्यवहार करताना या गोष्टींची काळजी घ्यावी.

Leave a Comment