व्हिसा संपल्यावर दुसऱ्या देशात जाण्यासाठी या पठ्ठ्याने वापरला भलताच मार्ग

व्हिसा संपल्या मायदेशी परतण्यासाठी एका व्यक्तीने केलेल्या कृत्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. अल्झेरियाच्या एका व्यक्तीने चक्क पुर्व तिमोरमधून पोहत ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला.

अल्झेरियाच्या या व्यक्तीचे नाव हमिनौग्ना अब्दुल रहमान आहे. तो मागील अनेक दिवसांपासून पुर्व तिमोरमध्ये राहत होता. मात्र व्हिसा संपल्यावर व पैसे संपल्यानंतर त्याने पोहत ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तो 570 किलोमीटर अंतर पोहून पार करणार होता. हा 31 वर्षीय युवक डिसेंबर 2019 पासून पर्यटक व्हिसाच्या आधारावर पुर्व तिमोरची राजधानी डिली येथे राहत होता.

त्याने ऑस्ट्रेलियाला पोहचण्याचा मार्ग तर निवडला होता, मात्र त्यात तो यशस्वी झाला नाही. रहमानला 11 जानेवारी रोजी इंडोनेशियाच्या पुर्व नुसा तेंगारा प्रांताच्या केतके समुद्रात तरंगताना मच्छिमारांनी वाचवले. मच्छिमारांनी जेव्हा त्याला वाचवले, त्यावेळी तो मरणाच्या अगदी जवळ होता. मात्र त्याला योग्यवेळी स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले. त्यानंतर अब्दुलला अताम्बुआच्या इमिग्रेशन कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.

Leave a Comment