एवढ्या पैशांमध्ये तुम्ही पूर्ण करु शकता ‘मन्नत’मध्ये राहण्याचे स्वप्न


बॉलिवूडचा रोमांसचा बादशहा अर्थात शाहरुख खानचे सोशल मीडियावर कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. त्यातच त्याच्या चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शाहरुखने काल ट्विटरवर #AskSRK म्हणत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. ट्विटरवर हा हॅशटॅश अगदी थोड्या वेळात ट्रेण्ड होऊ लागला आणि चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. चाहत्यांना निराश न करता शाहरुखनेही शक्य तेवढ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.


एका चाहत्यांने या दरम्यान अतिशय रंजक प्रश्न विचारला. शाहरुखनेही त्याच्या या विचित्र प्रश्नावर अतिशय हुशारीने उत्तर दिले. शाहरुखच्या या प्रश्न उत्तराचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखचे उत्तर ऐकून त्याला बॉलिवूडचा बादशहा का म्हणतात ते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.


शाहरुखला ट्विट करत एका चाहत्याने विचारले की, सर, मला मन्नतमधील एक रुम भाड्याने हवी आहे. काय भाडे असेल. शाहरुखने या प्रश्नाचे उत्तर देताना लिहिले की, ३० वर्षांच्या मेहनतीच्या किंमतीत मिळेल. चाहत्याने शाहरुखला विचारलेला हा प्रश्न आणि त्यावर शाहरुखने दिलेले उत्तर अनेकांना आवडले.

यावेळी शाहरुखला रितेश देशमुखनेही एक प्रश्न विचारला. ट्विट करत रितेशने विचारले की, अशी कोणती गोष्ट आहे जी तू अब्रामकडून शिकलास, शाहरुखने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, तुम्ही जेव्हाही दुःखी, भूकेलेले किंवा रागात असाल तेव्हा आवडता व्हिडिओ गेम खेळत थोडे रडा.

Leave a Comment