सावधान ! जुने स्मार्टफोन हॅक होण्याचा धोका सर्वाधिक

अनेकजण कितीतर वर्ष जुन्या स्मार्टफोनचा वापर करत असतात. जुने स्मार्टफोन हे काही वर्षांनी अपडेट देणे बंद करतात. त्यामुळे हे स्मार्टफोन वापरणे धोकादायक ठरू शकते. कारण हॅकर्स अशा फोनला सहज लक्ष्य करतात.

सायबर तज्ञांच्या मते, जास्त जुन्या मॉडेलचा वापर न करता युजर्सनी नवीन स्मार्टफोन वापरणे गरजेचे आहे. रिपोर्टनुसार, जुन्या फोनचा वापर करणाऱ्यांची हॅकर्स हेरगिरी सहज करू शकतात व गोपनीय माहिती चोरू शकतात.

कंपन्या जुन्या स्मार्टफोन्सला अपडेट देत नाही. कारण सर्व फोन्सला अपडेट देणे शक्य नसते. फोनला अपडेट न मिळणे धोकादायक ठरते. सिक्युरिटी स्पेशलिस्ट ब्रायन हिगिंस यांचे म्हणणे आहे की, विना सपोर्ट सॉफ्टवेअर आणि डिव्हाईस ग्राहकांसाठी खतरनाक आहे. कारण यामध्ये सायबर क्रिमिनल्सपासून वाचण्यासाठी काहीही सुरक्षा नसते. युजर्स स्वतः एंटी व्हायरस सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकत नाहीत.

जुन्या स्मार्टफोनमधून हॅकर्स सहज फोटो, सोशल मीडिया नेटवर्क्स, कॉन्टॅक्ट आणि बँक डिटेल्ससारखी महत्त्वाची माहिती चोरी करू शकतात.

आयफोन 6 आणि त्यापेक्षा जुन्या मॉडेल्सला आयओएस13 सॉफ्टवेअर अपडेट मिळू शकत नाही. जुन्या फोनमध्ये नवीन सॉफ्टवेअर न मिळाल्याने हॅकिंगचा धोका वाढतो. अँड्राईड फोनमध्ये 2 ते 3 वर्षांनी अपडेट मिळणे बंद होते. त्यामुळे हॅकिंगचा धोका अधिक वाढतो.

हॅकर्स जुन्या स्मार्टफोन युजर्सला एसएमएस अथवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लिंक पाठवतात. यासोबतच प्ले स्टोर आणि अ‍ॅपस्टोरमध्ये बग असलेले अनेक अ‍ॅप्स आहेत, यापासून जुन्या स्मार्टफोनला संरक्षण मिळत नाही.

Leave a Comment