प्रजासत्ताक दिनासाठी ‘या’ शिक्षकाने बनवला अनोखा राष्ट्रध्वज


आता अवघ्या काही दिवसांनी आपला देश 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्यातच प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण असल्यामुळे आपल्यापैकी अनेकजणांमध्ये या सणाच्या काही दिवस आधीच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.

राजधानी दिल्लीतील राजपथावर आयोजित करण्यात येणाऱ्या परेडपासून ते बाजारात विकल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या झेंड्यांपर्यंत सर्वत्र ही तयारी अगदी प्रकर्षाने दिसून येते. पंजाबच्या अमृतसरमधील येथील एका शिक्षकाने देखील असाच खास उत्साह दाखवत यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी अनोख्या रूपात राष्ट्रध्वज तयार केला आहे. विशेष म्हणजे या हा ध्वज कपड्याचा नसून चक्क टूथपिक पासून बनवण्यात आला आहे. तब्बल 71 हजार टूथपिक यासाठी वापरण्यात आल्या असून 40 तासांच्या मोठ्या अवधीत या शिक्षकाने ध्वज पूर्ण केला आहे.

या ध्वजांचे काही फोटो एका वृत्तसंस्थेने शेअर केले आहेत, ज्यात आपल्या टूथपिक जोडून त्याचे तिरंगी माळ शिक्षकाने बनवली आहे आणि मग या मला जोडून एक ध्वज साकारलेला आपण पाहू शकता. नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस अगदी हटके अशी ही कल्पना उतरत आहे.

Leave a Comment