केवळ एका विद्यार्थीनीसाठी भरते ही शाळा

शाळा ही मुलांमुळे चालत असते. मुले शाळेत येतात, शिक्षण घेतात व निघून जातात. त्यांच्या जागी नवीन विद्यार्थी येतात. हा क्रम सुरूच असतो. मात्र तुम्ही कधी एका विद्यार्थ्यासाठी शाळा सुरू असल्याचे ऐकले आहे का ? नाही ना. मात्र बिहारमध्ये अशी एक शाळा आहे जी केवळ एका लहान मुलीसाठी सुरू असते.

बिहारमधील गया शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरील मनसा बिगहा येथे ही सरकारी शाळा आहे. येथे दररोज केवळ एकच छोटी मुलगी शिकण्यासाठी येते. जान्हवी कुमारी नाव असलेली ही विद्यार्थीनी पहिलीच्या वर्गात शिकते. तिला शिकवण्यासाठी दररोज 2 शिक्षक येतात.

येथील गावात केवळ 35 कुटुंब राहतात. इतर सर्व मुले खिजरसराय येथील शाळेत जातात. त्यामुळे केवळ जान्हवी या सरकारी शाळेत शिकते.

मिड डे मील योजनेंतर्गत जान्हवीसाठी जेवण देखील बनते. या शाळेत 4 वर्ग आहेत. शाळेचे मुख्यध्यापक सत्येंद्र प्रसाद सांगतात की, त्यांनी या भागातील लोकांच्या भेटी घेऊन या शाळेत मुलांना पाठवण्याची विनंती देखील केली. मात्र कोणीच रुची दाखवली नाही.

त्यांनी सांगितले की, 9 विद्यार्थ्यांनी अडमिशन घेतले आहे. मात्र केवळ जान्हवी येथे शिकायला येते. अनेकजण आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवत आहेत. गावातील लोक समृद्ध आहेत, त्यामुळे ते आपल्या मुलांना 1 किलोमीटर लांब खाजगी शाळेत पाठवतात.  केवळ एका विद्यार्थीनीचे भविष्य घडवण्यासाठी सुरू असलेल्या या शाळा व शिक्षकांचे कौतूक व्हायलाच हवे.

Leave a Comment