हे विचित्र शहर आपल्याच देशापासून आहे विभक्त

एखादा देश तेव्हाच स्थापन होतो, जेव्हा त्याच्या आजुबाजूचे शहर एकमेंकाशी जोडलेले असतील. मात्र तुम्ही कधी अशा शहरांबद्दल ऐकले आहे का जे आपल्या देशात नाही ? हे शहर आपल्याच देशापासून पुर्णपणे विभक्त आहे. द्वितीय विश्वयुद्धा दरम्यान हे शहर जर्मनीच्या ताब्यात होते.

Image Credited – Amar ujala

हे शहर आहे रशियातील कॅलिनिनग्राद. जवळपास 4 लाख लोकसंख्या असलेले हे शहर यूरोपियन देश लिथुआनिया आणि पोलंडच्या मध्यभागी आहे. मात्र या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी रशियाच्या व्हिसाची गरज पडते. या शहरात जाण्यासाठी लोकांना दुसऱ्या देशाची सीमा पार करून जावे लागते.

Image Credited – BBC

कॅलिनिनग्राद हे शहर बाल्टिक सागरात समावेश होणाऱ्या प्रीगोलिया नदीच्या किनारी आहे. मध्यु युगात हे शहर जुन्या प्रशियाचा त्वांगस्ते नावाचे एक शहर होते. प्रशिया हे उत्तर यूरोपमधील एक ऐतिहासिक जर्मन राज्य होते. नंतर याच्या अधिकतर भागावर पुर्व जर्मनी, पोलंड आणि रशियाने कब्जा केला.

Image Credited – Amar ujala

द्वितीय विश्वयुद्धादरम्यान 1944 मध्ये ब्रिटिश सैन्याने या शहरावर बॉम्ब वर्षाव केला. त्यानंतर हे शहर पुर्णपणे उद्धवस्त झाले. 1945 मध्ये रशियाने या शहरावर कब्जा केल्याने अनेक जर्मन नागरिकांना शहर सोडावे लागले. आता येथील 87 टक्के लोकसंख्या रशियन आहे.

Image Credited – Amar ujala

हे रशियन शहर लिथुआनिया आणि पोलंडच्या मध्यभागी आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आपल्या देशात जाण्यासाठी दुसऱ्या देशातून जावे लागते. यासाठी रशिया व पोलंडमध्ये करार झाला आहे. या अंतर्गत येथील प्रवाशांसाठी एक विशेष कार्ड बनवण्यात आले आहे. ज्यामुळे ते कोणत्याही अडचणीशिवाय पोलंडमधून आपल्या देशात जावू शकतात.

Leave a Comment