भारतीय जीपीएस सिस्टम ‘नाविक’ असलेले क्वॉलकॉमचे चिपसेट लाँच

प्रमुख चिपसेट निर्माता कंपनी क्वॉलकॉमने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबत  (इस्त्रो) मिळून भारतात तीन चिपसेट लाँच केले आहेत. यामध्ये स्नॅपड्रॅगन 720जी, स्नॅपड्रॅगन 662 आणि स्नॅपड्रॅगन 420 चा समावेश आहे. आपल्या नवीन चिपसेटबद्दल क्वॉलकॉमने दावा केला आहे की, हे आधीच्या तुलनेत अधिक चांगली 4जी कनेक्टिव्हिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस देईल.

या तिन्ही चिपसेटमध्ये 5जी सपोर्ट देण्यात आलेला नाही. या चिपसेटची खास गोष्ट म्हणजे यात इस्त्रोच्या ‘नाविक’ या नेव्हिगेशन सिस्टमचा सपोर्ट देण्यात आला आहे. नाविक ही भारतीय जीपीएस सिस्टम आहे.’

काय आहे नाविक ?

नाविक हे भारताचे स्वतःचे सेटेलाईट नेव्हिगेशन सिस्टम आहे. नाविकमध्ये ड्युअल फ्रिक्वेंसी आहे. त्यामुळे ते जीपीएसपेक्षा अचूक असेल. जीपीएसमध्ये केवळ एक फ्रिक्वेंसी आहे. ते भारत आणि त्याच्या सीमा भागातील 1500 किमीपर्यंत अंतरातील लोकेशन डेटा, भौगोलिक माहिती देईल. जीपीएसपेक्षा नाविकची अचूकता सहापट अधिक असेल.

स्मार्टफोन कंपन्या शाओमी आणि रिअलमीने स्पष्ट केले आहे की, लवकरच भारतात स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसर सोबत आपले स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये नाविक सपोर्ट मिळेल.

Leave a Comment