72 वर्षीय व्यक्तीसोबत पाचव्यांदा विवाहबद्ध झाली पामेला अँडरसन


हॉलीवुड अभिनेत्री पामेला अँडरसन वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे. तिने 72 वर्षीय व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांतून पामेला चर्चेचा विषय ठरली आहे. पामेलाचा हा पाचवा विवाह आहे. पामेला हॉलीवुड प्रोड्यूसर जॉन पीटर्स यांच्यासोबत पाचव्यांदा विवाहबद्ध झाली आहे. असे सांगितले जात आहे की, दोघेही गेल्या प्रदीर्घ काळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

याबाबत तेथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खासगी पद्धतीने पामेला अँडरसन आणि जॉन पीटर्स या दोघांनी विवाह आटोपला आहे. दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात. दोघांच्या वयाबाबत सांगायचे तर पामेला आता पन्नाशीत आहे तर, तिचा पती जॉन पीटर्स हा सत्तरीत आहे. पामेला नुकत्याच आलेल्या ‘बेवॉच’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. तर, ‘बॅटमॅन’ च्या निर्मितीबद्दल जॉन पीटर्स हे ओळखले जातात.

या आधी पामेला अँडरसन हिने चार लग्न केली होती. रॉकर्स, टॉमी ली आणि किड रॉक अशी तिच्या या आधीच्या पतींची नावे आहेत. त्यानंतर तिने 2 वेळा प्रोफेशनल पोकर रिंक सॉलोमॉन याच्यासोबत विवाह केला. दरम्यान, आता ही अभिनेत्रीने हेअर स्टाइलिस्ट राहिलले प्रोड्युसर जॉन पीटर्स यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

जॉन पीटर्स याच्यासाठी पामेला अँडरसन हिने एक प्रेमकविताही लिहिली आहे. त्याचबरोबर हॉलिवुडचा ‘ओरिजनल बॅड बॉय’ असेही संबोधले आहे. ‘द ओरिजनल बॅड बॉय ऑफ हॉलिवुड’ असे पामेलाच्या या कवितेचे नाव आहे. हॉलिवुड पोर्टलला दिलेल्या प्रतिक्रियेत अँडरसन हिने म्हटले आहे की, कोणतीही तुलना करता येणार नाही. ते शक्य नाही. मी त्याच्या कुटुंबावर अत्यंत निर्मळ प्रेम करते. दरम्यान, बिग बॉसच्या 4 हंगामात पामेला पाहुणी म्हणूनही झळकली होती.

Leave a Comment