एमजी मोटर्सने भारतात आपली बहुप्रतिक्षित पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार एमजी झेडएस ईव्ही लाँच केली आहे. दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या एसयूव्हीच्या ‘Exclusive’ व्हेरिएंटची किंमत 23.58 लाख रुपये आहे. तर ‘Excite’ व्हेरिएंटची किंमत 20.88 लाख रुपये आहे. या व्यतरिक्त ज्या ग्राहकांनी 17 जानेवारीपर्यंत या एसयूव्हीचे बुकिंग केले आहे, त्यांना कंपनी 1 लाख रुपये डिस्काउंट देखील देत आहे.

लाँचिंगच्या आधीच ही एसयूव्ही लोकप्रिय झाली आहे. मागील 27 दिवसात या एसयूव्हीचे 2800 पेक्षा अधिक बुकिंग झाले आहेत. कंपनीने दिल्ली-एनसीआर, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांमध्ये सर्वात आधी एसयूव्ही लाँच केली आहे. सुरक्षेसाठी एमजी झेडएस ईव्हीला यूरो एनसीएपीकडून 5 स्टार रेटिंग देखील मिळाली आहे.

एमजी झेडएस ईव्ही मध्ये देण्यात आलेली मोटार 141 बीएचपी पॉवर आणि 353 एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये 44.5 kWh बॅटरी देण्यात आलेली आहे. रेंजबद्दल सांगायचे तर ही एसयूव्ही सिंगल चार्जिंगमध्ये 340 किमी अंतर पार करू शकते. ही इलेक्ट्रिक कार केवळ 8 सेंकदामध्ये ताशी 0 ते 100 चा वेग पकडू शकते.

सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये सहा एअरबॅग्स, ईएसपी, एबीएससोबत ईबीडी, हिल स्टार्ट, डीसेंट कंट्रोल, टीपीएमएस पेडेस्टेरियन वॉर्निंग सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग प्वाइंट्स, सीटबेल्ट प्रीटेंशनर्स आणि रिअर फॉग लँप्स सारखे फीचर्स मिळतील.