देशात पहिल्यांदाच प्राण्यांसाठी उभारणार युद्ध स्मारक

देशात पहिल्यांदाच एखाद्या वॉर मेमोरियलमध्ये (युद्ध स्मारक) देशासाठी प्राण गमवणाऱ्या प्राण्यांचे नाव नोंदवले जाणार आहे. हे स्मारक उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील रिमाउंड अँड वेटरनरी कोर सेंट्र अँड कॉलेजमध्ये तयार करण्यात येईल. यथे 300 कुत्रे, 350 हँडलर्स, घोडे आणि गाढवांची नावे लिहिली जातील.

स्मारकासाठी जमीन आणि डिझाईन आधीच तयार करण्यात आलेले आहे. हे स्मारक जम्मू-काश्मिर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी ऑपरेशन, कारगिल युद्धात प्राण गमवलेल्या प्राण्यांची आठवण करून देईल. स्मारकावर प्राण्याचे नाव, सर्व्हिस नंबरसह सर्व माहिती नोंदवण्यात येईल. दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाप्रमाणेच हे स्मारक असेल. येथे सैन्याच्या प्राण्यांचे प्रजनन, पालन आणि प्रशिक्षण दिले जाते.

सैन्यात सध्या 100 कुत्रे, 5000 गाढव आणि जवळपास 1500 घोडे सेवेत आहेत. सैन्य दिनाच्या निमित्ताने 5 लॅब्रोडारला कमांडेशन कार्डाने सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Comment