या ठिकाणी चक्क माशांच्या कातडीपासून तयार होतात कपडे


बीजिंग : गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधील एक अल्पसंख्याक जमात आपले पिढीजात काम करत आहे. माशांच्या कातडीपासून कपडे तयार करण्याचे काम गेल्या अनेक पिढ्या हा समाज करत आहे. ही अनोखी कला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचली आहे. आताही या समाजातील तरुणांना माशांपासून कपडे तयार करण्याची ही कला अवगत आहे. चीन हा माशांच्या कातडीपासून कपडे बनवणारा एकमेव देश आहे. असे कपडे या जमातीतील लोकच तयार करतात आणि तेच कपडे घालतात देखील! महिला माशांच्या कातडीपासून आजही युविंग फिंग ह्या 68 वर्षाच्या कपडे तयार करतात. ही कला त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली आहे.

अनेक मासे एक कपडा तयार करण्यासाठी लागत असल्याचे फिंग सागतात. 50 मासे महिलेचा एक कपडा तयार करण्यासाठी लागतात. तर 56 मासे पुरुषाचे कपडे तयार करण्यासाठी लागतात. माशांच्या कातड्यापासून तयार होणारे कपडे टिकाऊ आणि चांगले असल्याचे फिंग सांगतात.

हे कपडे सर्वच माशांच्या कातडीपासून तयार केले जात नाहीत. खास माशांचा त्यासाठी वापर होतो. हे कपडे सेममाई, माईक आणि सालमन या माशांच्या कातडीपासून तयार केले जातात. पण ही कला आता दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. हेजे प्रांतातील काही लोकच माशांपासून कपडे तयार करतात.

केवळ काही लोकांनाच माशांपासून कपडे तयार करण्याची कला माहिती आहे. ही कला दिवसेंदिवस नाहीशी होत असल्याचे समोर आले आहे. माशांच्या कातड्यांपासून कपडे तयार करण्याचे काम कठीण आहे. माशांच्या कातडीला सुरुवातीला माशांपासून वेगळे केल्यानंतर ते कातडे सुकवले जाते आणि कातडी नरम केली जाते. कातडीवर तब्बल एक महिना काम केले जाते. त्यानंतर कपडे 20 दिवसांनी कातडी शिवून तयार केले जातात. काही वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावरही माशांच्या कपड्याला मागणी येते. काही प्रसिद्ध ब्रँडसुद्धा त्यांच्या उत्पादनात माशांच्या कातडीचा वापर करतात.

माशांच्या कातडीपासून कपडे तयार करण्याची कला संपणार असल्याची यूविंग फिंग यांना भीती वाटते. कला जिवंत राहावी यासाठी फिंग यांनी स्थानिक महिलांना ही कला शिकवण्याचा संकल्प केला आहे. मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी देहबोली इतरांनी शिकावी असे त्यांना वाटते. त्या इतरांना माशांची हालचाल समजण्याची कला अवगत करण्याची कलाही शिकवण्यास तयार आहे. ही कला शिकणे खूप कठीण आहे. पण अनेकांना आपण ही कला शिकवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment