मनसेला सोडचिठ्ठी देत धर्मा पाटलांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश


मुंबई : एकीकडे मुंबईत मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरु असताना आणि राज ठाकरे यांनी पक्षात धोरणात्मक बदल केले असतानाच मनसेला एक धक्का बसला आहे. मनसेला सोडचिठ्ठी देऊन धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केलेले ८० वर्षाचे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


नरेंद्र पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केल्यानंतर पाटील यांना धुळ्यातून मनसेने उमेदवारी जाहीर केली होती. पण, त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर केवळ चारच महिन्यांत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Leave a Comment