झेंड्यावर राजमुद्रा ठेवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - Majha Paper

झेंड्यावर राजमुद्रा ठेवल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


पुणे: मनसेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त साधून आयोजित केलेल्या महाअधिवेशनात आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. भगव्या रंगाचा मनसेचा हा नवा झेंडा असून, त्यावर राजमुद्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. तिचा वापर राजकीय पक्षाने करणे चुकीचे असल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने करत तसे निवेदन पोलीस ठाण्यात दिले आहे.

मनसेचे सध्या मुंबईत राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. राज ठाकरे यांनी या अधिवेशनात पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण केले. हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे त्याच्याखाली लिहिण्यात आले आहे. पण संभाजी ब्रिगेडने मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्याला विरोध केला आहे. मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेविरोधात तक्रार केली आहे.

Leave a Comment