तुमची खासगी माहिती लीक करत आहेत डेटिंग अ‍ॅप


आपण सध्या डिजीटल युगात वावरत आहोत. त्याच परिस्थिती अनुरुप आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन पद्धतीच्या मदतीने एकमेकांना डेट करतात आणि विविध अॅप त्यासाठी उपलब्ध झाले असून मैत्रीच्या नात्याची त्याच्या माध्यमातून सुरुवात होते. टिंडर, ग्रिंडर, OKक्युपिड सारखे डेटिंग अ‍ॅपची तरुणाईमध्ये चलती आहे. पण तुम्ही जर डेटिंग अॅप वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सध्या तुमची खासगी माहिती डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून लीक करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका अहवालानुसार, डेटिंग अ‍ॅपवरील युजर्सचा डेटा लीक करुन दुसऱ्या कंपनीसोबत शेअर करणे हे नियमबाह्य आहे.

याबाबत माहिती देताना नॉर्वे कंज्युमर काउंसिल सरकारच्या मदतीने चालणाऱ्या नॉन प्रॉफिट ग्रुपने असे सांगितले आहे की, स्मार्टफोन युजर्सच्या प्रोफाईलला ऑनलाईन पद्धतीने जाहीरात करणाऱ्या कंपन्या ट्रॅक करतात. नॉर्वेच्या या काउंसिलने 10 अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपबाबत एका सायबर सिक्युरिटी कंपनी मन्मॉनिकसोबत (Mnemonic) मिळून अभ्यास केला आहे. या दरम्यान असे समोर आले की, 135 विविध थर्ट पार्टी जाहिरातदार कंपन्यांना हे डेटिंग अॅप युजर्सचा डेटा शेअर करत आहेत.

युजर्सचा डेटा लीक करण्याची स्थिती हाताबाहेर असल्यात्यामुळेच जीडीपीआर नियम या डेटा लीकच्या प्रकरणावर चाप बसवण्यासाठी लागू करण्यास सांगितला आहे. अहवालात असे देखील म्हटले गेले आहे की, पिरीयड ट्रॅकर अॅप आणि व्हर्च्युल मेकअप अॅप परफेक्ट 365 सारखे अॅप ही युजर्सचा पर्सनल डेटा लीक करत आहेत.

Leave a Comment