यांनी चक्क वर्षभर हनीमून ट्रिप साजरी करत केला एवढ्या देशांचा प्रवास

प्रेमात पडलेल्या दोन लोकांसाठी लग्न करणे आणि हनीमूनला जाणे ही सामान्य बाब आहे. मात्र एखाद्या जोडप्याने तब्बल 1 वर्ष आपली हनीमून ट्रिप साजरी केली तर ? लोक प्रेमात काहीही करू शकतात, हे यावरून सिद्ध होते.

एका जोडप्याने आपल्या लग्नानंतर तब्बल 1 वर्ष हनीमून साजरा केला व या दरम्यान ते तब्बल 33 देश फिरले.

View this post on Instagram

We originally planned to train from Munich, Germany to Zurich, Switzerland but then spontaneously we realized we could drive it instead. So we rented a car. Drove from Germany, into Austria, made a stop in Liechtenstein, visited authentic towns, saw amazing scenic views, added 2 more countries into the mix and all the while it was cheaper and shorter than taking the train. Depending on where you are in Europe you can easily drive from country to country. It’s worth the research and some times ends up being the better option! . #MarryMeIn Lauterbrunnen, Switzerland 🇨🇭 . . . . . #switzerland #inLOVEwithSWITZERLAND #switzerland_vacations #topswitzerlandphoto #travelinstagram #spain_vacations #mydestinationguide #speechlessplaces #backpackwithme #femmetravel #spain🇪🇸 #spaintravel #voyaged #travelandleisure #spain #visitspain #travelanddestinations #iamtb #dametraveler #mustdotravels #citizenfemme #traveltagged #ootdgals #europe_vacations #topeuropephoto #TLPicks #travelblogger #travelwithme #creativetravelcouples

A post shared by Nick, Zoe & Pierre 🐶 (@marrymeintravel) on

फिरण्याची आवड असलेल्या या जोडप्याचे नाव निक आणि जो ऑस्ट आहे. या जोडप्याने लग्नाआधी 2 वर्ष बचत केली व लग्नानंतर नोकरी सोडत लांबलचक हनीमून ट्री प्लॅन केली. दोघांनी एकमेंकाना या ट्रिपचे वचन दिले होते व तेव्हाच लग्नास तयार झाले. अखेर लग्नानंतर दोघांनी एकमेंकाना दिलेले वचन पाळले.

या जोडप्याने 31 डिसेंबर 2017 ला न्यू जर्सी येथे लग्न केले होते. या दोघांच्या या प्रवासांचे अतिंम ठिकाण सेशेल्स होते. या प्रवासादरम्यान त्यांनी मालदीव, तुर्की हे देश फिरले. त्यांनी भारतात ताजमहालसमोर फोटो काढले, माउंट एव्हरेस्टवर हेलिकॉप्टरने गेले, न्यूयॉर्कच्या सेंट्र पार्कमध्ये पिकनिक साजरी केली व जापानचा देखील प्रवास केला.

निक आणि जोचा हनिमून प्रवास ऑक्टोबर 2018 ला समाप्त झाला. दोघांनीही या प्रवासाचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Leave a Comment