बंद होणाऱ्या 100 वर्ष जुन्या दुकानाला एका ट्विटने दिला आधार

ब्रिटनमधील एक 100 वर्ष दुकान बंद होण्याच्या मार्गावर होते. मात्र एका ट्विटमुळे सर्वकाही अचानक बदलले व एका दिवसात दुकानातील पुस्तकांची हजार पट अधिक विक्री वाढली. प्रसिद्ध इंग्रजी लेखक नील गायमॅन यांनी दुकानाच्या मालकाचे एक ट्विट रिट्विट केले व सर्वकाही बदलले.

पुर्व हेमशायर जिल्ह्यातील पीटर्सफील्डचे सर्वात जुने बुकस्टोर पीटर्स फील्ड बुक शॉपच्या मालकाने दुकानाचे काही फोटो ट्विटरवर अपलोड करत लिहिले की, आमचे दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे. आज एकही पुस्तक विकले गेले नाही.

अनेक युजर्सनी दुकान मालकाला दिलासा दिला. मात्र नील गायमॅन यांनी ट्विट रिट्विट करत दुकान बंद न करण्याचा सल्ला दिला. सोबतच आपल्या फॉलोवर्सला मदत करण्यास सांगितले. नील गायमॅन यांच्या एका ट्विटने कमालच केली. त्यानंतर एवढी पुस्तके ऑनलाईन बुक होऊ लागली की दुकानाचा मालक देखील आश्चर्यचकित झाले.

बुकिंग करणाऱ्यांची रांगच लागली. एकादिवसात तब्बल 20 हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचे ऑर्डर बुक झाले.

दुकान मालकाने देखील मान्य केले की, जर ट्विटर्स युजर्सची मदत मिळाली नसती तर दुकान बंद करावे लागले असते. ज्या सर्वांनी ऑर्डर केली, त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

Leave a Comment