फेशियल रिकॉग्निशनवर तात्पुरती बंदी घालण्यास पिचाई यांचा पाठिंबा

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यूरोपियन यूनियनतर्फे करण्यात आलेली फेशियल रिकॉग्निशन टेक्नोलॉजीवर तात्पुरती बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. सुंदर पिचाई म्हणाले की, सरकारने लवकरात लवकर या प्रकरणावर निर्णय घ्यावा. सोबतच ते म्हणाले की, यासाठी फ्रेमवर्क तयार करावा लागेल व विशेषतज्ञांनी फेशियल रिकॉग्निशन तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा, याचा विचार करावा.

हॅकर्स करू शकतात चुकीचा वापर –

तुमचे फोनमधील नंबर आणि ईमेल आयडी ज्याप्रमाणे डेटाबेसमध्ये स्टोर होतात. त्याचप्रमाणे फेस डेटा देखील टेक कंपन्यांच्या डेटामध्ये स्टोर होतो. यामुळे युजर्सचा डेटा लीक होऊ शकतो. पासवर्ड हॅक झाल्यास युजर्सला तो बदलता येता. मात्र फेस डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तसा कोणताही विकल्प नाही.

सुंदर पिचाई म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंसला नियंत्रित करणे योग्य नाही. हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजेंससाठी गाइडलाइन तयार करण्याची देखील गरज आहे.

गुगल याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणात गुंतवणूक करणार आहे. ते म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे फायदे व नुकसान यामध्ये संतूलन बनवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सेल्फ ड्रायव्हिंग कारसाठी नियम आणि हेल्थ केअरसाठी फ्रेमवर्क तयार करणे गरजेचे आहे.

Leave a Comment