तेजस एक्सप्रेसला उशीर झाल्याने प्रत्येक प्रवाशाला मिळणार एवढे पैसे

अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसला तब्बल 80 मिनिटे उशीर झाल्याने प्रत्येक प्रवाशाला भरपाई देण्यात येणार आहे. रेल्वेमधील 630 प्रवाशांना 100 रुपये उशीर झाल्यामुळे भरपाई दिली जाणार आहे. तेजस एक्सप्रेस ही एकमेव अशी रेल्वे आहे जी उशीर झाल्यास आपल्या प्रवाशांना भरपाई देते.

जर रेल्वेला एक तासांपेक्षा अधिक उशीर झाल्यास 100 रुपये व 2 तास उशीर झाल्या प्रवाशांना 250 रुपये दिले जातात. प्रवाशांना भरपाई देण्याची ही तेजस एक्सप्रेसची दुसरी वेळ आहे. याआधी देखील ऑक्टोंबर 2019 मध्ये दिल्ली-लखनऊ तेजस एक्सप्रेसने 950 प्रवाशांना तीन तास उशीर झाल्याने 250 रुपये भरपाई दिली होती.

मीरा रोड ते भायंदर दरम्यान 12.38 ते 1.30 पर्यंत ओव्हरहेड उपकरणांमध्ये तांत्रिकी बिघाड झाला होता. याचा परिणाम पश्चिम रेल्वे सर्व्हिसवर परिणाम झाला.

प्रवाशांना भरपाई मिळवण्यासाठी 1800-266-8844 नंबरवर कॉल अथवा [email protected] यावर मेल करावा लागेल. त्यांना आपल्या पीएनआर नंबरसोबत इंश्योरेंस नंबर आणि एक कॅन्सल चेक द्यावा लागेल. ही सर्व माहिती दिल्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल.

Leave a Comment