राहुल गांधी यांनी उद्धवजींसोबत अयोध्येला जावे-संजय राउत


फोटो सौजन्य मिकटीव्ही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाआघाडी सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यावर रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत तेव्हा त्याच्यासोबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावे असे आमंत्रण शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते खासदार संजय राउत यांनी दिले आहे.

राउत म्हणाले राहुल गांधी अनेकदा मंदिरातून दर्शनासाठी जातात. महाराष्ट्र सरकारमध्ये कॉंग्रेस आमचे सहयोगी आहेत. सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमी संदर्भात ९ नोव्हेंबर २०१९ ला निर्णय दिला तेव्हाच अयोध्येत दर्शनाला जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. महाराष्ट्रात २८ नोव्हेंबरला शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडी सरकार मध्ये उद्धव यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मार्च मध्ये या सरकारच्या कारभाराला १०० दिवस पूर्ण होत आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे सांगून आत्तापर्यंत त्यांनी दोनवेळा अयोध्येला भेट दिल्याचे सांगितले होते तसेच अयोध्या भेटीसाठी वारंवार येणार असल्याचेही सूचित केले होते. ते म्हणाले होते या जागेमध्ये निश्चित काहीतरी शक्ती आहे. १६ जून २०१९ ला उद्धव यांनी त्यांच्या पक्षसदस्यांसोबत अयोध्येला भेट दिली होती.

Leave a Comment