या वर्षात ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे तीन वर्ल्डकप


फोटो सौजन्य वोक जर्नल
यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे तीन वर्ल्ड कप आयोजित केले जात आहेत. यंदा ऑस्ट्रेलियात ११ व्या इनडोअर क्रिकेट वर्ल्ड कप बरोबरच महिला टी २० आणि पुरुष टी २० वर्ल्ड कप सामने खेळले जाणार आहेत.

वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशनने या वर्षीच्या ११ व्या सिझनचे वर्ल्ड कप सामने ऑस्ट्रेलिया मध्ये होत असल्याची घोषणा केली असून हे सर्व सामने मेलबर्न येथे १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. आजपर्यंतच्या सर्व १० इनडोअर वर्ल्ड क्रिकेट सिरीज मध्ये ऑस्ट्रेलियाच विजयी झाला असून आता ते ११ व्या विजेतेपदासाठी प्रयत्न करतील. यापूर्वीचा इनडोअर क्रिकेट वर्ल्ड कप युएइ मध्ये दुबईत २०१७ मध्ये खेळला गेला होता.

यंदा फेब्रुवारी मार्च मध्ये ऑस्ट्रेलियात महिला टी २० वर्ल्ड कप होत असून यात १० टीम सहभागी आहेत. त्या २३ सामने खेळतील. ऑक्टोबर मध्ये पुरुष टी २० वर्ल्ड कप होत आहेत. यात १६ टीम ४५ सामने खेळणार आहेत.

Leave a Comment