बॉडीबिल्डर जेलर दीपक शर्मा


फोटो सौजन्य झी न्यूज
कोणत्याही फिल्मी हिरोला सहज मात देईल अशी बॉडी असलेले एक जेलर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. दीपक शर्मा असे त्यांचे नाव असून ते दिल्लीच्या मंडोली जेल मध्ये असिस्टन्ट जेलर पदावर कार्यरत आहेत. त्यांना जेल परिसरात बाउंसर म्हणून ओळखले जाते.

अर्थात उत्त्तम बॉडी मिळविण्यासाठी दीपक यांनी कसून मेहनत केली असून आजही व्यग्र कामाच्या तासातून ते ४ ते ५ तास रोज जिम मध्ये व्यायाम करतात. ४८ इंचाची चेस्ट, साडे अठरा इंचाचे बायसेप्स आणि ३० इंच कंबर असे त्यांचे फिजीक आहे.

दीपक यांनी दिल्लीतून १२ वी पास केल्यावर आर्ट शाखेची पदवी मिळविली असून २००९ मध्ये त्याची दिल्ली पोलीस दलात निवड झाली. त्यावेळी त्यांना तिहार मध्ये असिस्टंट जेलर पदावर नेमले गेले. अर्थात यावेळी त्यांची बॉडी सर्वसामान्य माणसाप्रमाणे होती. मात्र २०१३ मध्ये त्यांना फिटनेसचे महत्व कळले आणि त्यांनी २०१५ पासून बॉडी बिल्डिंगला सुरवात केली. त्यासाठी कसून मेहनत घेतली. त्यामुळे त्यांना जेल बाउंसर अशी ओळख मिळाली.

दीपक यांनी आजपर्यंत ११ स्पर्धात सहभाग घेतला असून अनेक मेडल्स मिळविली आहेत. मिस्टर दिल्ली, मिस्टर यूपी, मिस्टर हरियाना, वायएमसीए मध्ये सिल्व्हर मेडल, आयर्न मॅन ऑफ दिल्ली मध्ये रजत, स्टील मॅन ऑफ इंडिया मध्ये रजत, गतवर्षी मि. इंडिया मध्ये गोल्ड अशी पदके त्याच्या खाती जमा आहेत.

Leave a Comment