सुरु झाले व्हॉट्सअॅपचे डार्क मोड


व्हॉट्सअॅपकडून आपल्या युझर्ससाठी डार्क मोड आणणार असल्याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती. त्यानुसार व्हॉट्सअॅपकडून बिटा व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी डार्क मोड उपलब्ध करून देण्यात आले आहे. तो लवकरच सर्व एँड्राईड आणि आयओएस मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

याबाबत WABetaInfo वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप बिटा एँड्राईड वापरकर्त्यांसाठी सध्या डार्क मोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्ही जर बिटा व्हर्जन वापरत असाल तर व्हॉट्सअॅपचे २.२०.१३ व्हर्जन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. नवे डार्क मोड फिचर या व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर चॅट्स मेनूमध्ये डार्क मोड पर्याय देण्यात आला आहे. तिथे यालाच डार्क थीम असे म्हटले आहे. डार्क मोड सुरू करण्यासाठी ग्राहकांना पुढील पद्धतीने जावे लागेल. सेटिंग्ज – चॅट्स – डिस्प्ले – थीम – डार्क थीम त्यानंतर तुमचे डार्क मोड सुरु होईल. डार्क मोड देताना व्हॉट्सअॅपकडून विविध इतर थीम्स उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचीही चर्चा होती. ती चर्चाही खरी ठरल्याचे दिसते आहे. युझर्संना एकूण चार थीम्स व्हॉट्सअॅपकडून देण्यात आल्या आहेत. त्यातून एक त्यांना निवडायची आहे.

Leave a Comment