टायटॅनिक बुडाल्यानंतर 107 वर्षांनी अमेरिका-ब्रिटनमध्ये झाला हा करार

जगप्रसिद्ध जहाज टायटॅनिकच्या अवशेषांना सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये महत्त्वपुर्ण करार झाला आहे. हे प्रसिद्ध जहाज 1912 ला उत्तर अटलांटिक महासागरातील विशाल हिमनगाला धडकून दुर्घटनाग्रस्त झाले होते. हे जहाज आपल्या पहिल्याच प्रवासाला निघाले होते.

या अंतरराष्ट्रीय करारामुळे या जहाजेवर कोणाला प्रवेश मिळणार व तेथील कोणत्या कलात्मक वस्तू हटवण्यात येतील, याचे अधिकार या दोन्ही देशांना मिळतील.

या कराराचा उद्देश जहाजेच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 1500 प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आठवणींना संरक्षित करणे हा आहे. या अवशेषांना आधी सुरक्षित करण्यात आले नव्हते, कारण हे जहाज जेथे बुडाले होते ते आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आहे. या अवशेषांचा शोध 1985 मध्ये लागला होता. मागील काही वर्षात हे अवशेष वेगाने नष्ट होत आहेत.

बेलफास्टच्या हार्लेंड अँड वोल्फ कंपनीने हे जहाज तयार केले होते. आपल्या पहिल्याच प्रवासाला निघालेले हे जहाज 15 एप्रिल 1912 ला बुडाले होते. हा पहिला प्रवास साउथॅम्प्टन ते न्यूयॉर्कमध्ये होता. टायटॅनिकबद्दल सांगण्यात आले होते की, हे जहाज कधीच बुडणार नाही.

Leave a Comment