टाटा मोटर्सने आज भारतात एकसोबत 4 कार लाँच केल्या आहेत. कंपनीने टाटा अल्ट्रोजसोबत 3 इतर फेसलिफ्ट मॉडेल टाटा नेक्सॉन, टाटा टियागो आणि टाटा टिगोर फेसलिफ्ट लाँच केले आहेत. या गाड्यांमध्ये बीएस6 इंजिनसह थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत.
किंमत –
नवीन टाटा नेक्सॉनची किंमत 6.95 लाख (पेट्रोल) ते 8.45 लाख रुपये (डिझेल) ठेवण्यात आली आहे. टाटा टिगोरची किंमत 5.75 लाखांपासून सुरू आहे. तर टाटा टियोगाच्या बेस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 4.60 लाख रुपये आहे.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट फीचर्स –
टाटा नेक्सॉनमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. यामध्ये बीएस6 इंजिन मिळेल. दोन्ही इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रांसमिशन येते.
कारमध्ये नवीन ग्रिलसोबत प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल देण्यात आलेले आहेत. सोबतच एलईडी टेललॅम्पस बदलण्यात आले असून, नवीन एलॉय व्हिल देण्यात आलेले आहेत. कारमध्ये अल्ट्रॉजप्रमाणे इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल.
कारमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, क्रूज कंट्रोल आणि पाणी सेंस करणारे वायपर्स मिळतील. नेक्सॉनमध्ये 35 कनेक्टेड कार फीचर्स देण्यात आले आहेत. ज्याद्वारे कार कंट्रोल करण्याबरोबरच मोबाईलमध्ये कारचे लोकेशन पाहू शकता.

टाटा टिगोर आणि टियागो फेसलिफ्ट फीचर्स –
या दोन्ही कारमध्ये पुढील बाजूला बदल करण्यात आलेले आहेत. यात नवीन बंपर, नवीन ग्रील आणि नवीन हेडलॅम्पस देण्यात आलेले आहेत. इंटेरियरबद्दल सांगायचे तर यामध्ये सेमी डिजिटल गेज, खालून फ्लॅट स्टेअरिंग व्हिल, रिव्हर्स कॅमेरा असिस्टसोबत 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेट सिस्टम मिळते. इंफोटेनमेट सिस्टममध्ये अपल कार प्ले आणि अँड्राईड ऑटो सपोर्ट करते.

टाटा टिगोरमध्ये पुश बटन देखील देण्यात आले आहे. या दोन्ही गाड्या बीएस6 मानक 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह लाँच करण्यात आल्या आहेत. हे इंजिन 86 bHP पॉवर आणि 113Nm टॉर्क जेनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रांसमिशन मिळेल.