टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसन तर, एकदिवसीय मालिकेसाठी पृथ्वी शॉचे पदार्पण


मुंबई – दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी वगळण्यात आलेल्या संजू सॅमसनला ‘रिप्लेस’ करण्यात आले आहे. तर, पृथ्वी शॉची या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी संघात वर्णी लागली आहे.

५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ खेळणार आहे. संजू सॅमसनची श्रीलंकेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवड झाली होती. एकाच सामन्यात अंतिम ११ मध्ये त्याला स्थान मिळाले. त्याने त्या सामन्यात पहिला चेंडू षटकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठी भारताच्या संघात संजू सॅमसनला संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, निवड समितीने त्याला वगळले होते.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धवनला दुखापत झाल्याने संजूला न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. तर, पृथ्वी शॉला भारताच्या एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. पृथ्वी शॉ न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय ‘अ’ संघाचा सदस्य असून त्याने प्रमुख संघाच्या निवडी आधीच ताबडतोड फलंदाजी करत आपली दावेदारी मजबूत केली होती. रणजी करंडक स्पर्धेत झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर पृथ्वी शॉने दमदार पुनरागमन केले. त्याने न्यूझीलंड अध्यक्षीय संघा विरुद्ध खेळताना १०० चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारासह १५० धावा झोडपल्या.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.

भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा –
५ सामन्यांची टी-२० मालिका
पहिली टी-२० – ऑकलंड – २४ जानेवारी
दुसरी टी-२० – ऑकलंड – २६ जानेवारी
तिसरी टी-२० – हॅमिल्टन – २९ जानेवारी
चौथी टी-२० – वेलिंग्टन – ३१ जानेवारी
पाचवी टी-२० – माऊंट माउंगानुई – ०२ फेब्रुवारी.

३ सामन्यांची एकदिवसीय मालिका –
पहिला एकदिवसीय सामना – हॅमिल्टन – ०५ फेब्रुवारी
दुसरा एकदिवसीय सामना – ऑकलंड – ०८ फेब्रुवारी
तिसरा एकदिवसीय सामना – माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी

Leave a Comment