स्थलांतरितांना आश्रय न देणाऱ्या देशांना होणार नुकसान – नडेला

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला काही दिवसांपुर्वीच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल भारतात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनावर मत मांडताना म्हणाले होते की, भारतात जे घडत आहे ते दुःखद आहे. आता सत्या नडेला यांनी पुन्हा एकदा स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतरित (इमिग्रंट) होणाऱ्यांबद्दल मत मांडले आहे.

सत्या नडेला म्हणाले की, जे देश स्थलांतरितांना आश्रय देणार नाहीत त्यांचे मोठे नुकसान होईल व टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये देखील विकास होणार नाही. नडेला म्हणाले की, सर्व देशांनी स्थलांतरितांचे समर्थन केले पाहिजे. मात्र त्यांनी भारताचे नाव घेतले नाही. ब्लूमर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले की, प्रत्येक देश आपल्या राष्ट्रहिताबाबत पुनर्विचार करत आहे. मात्र हा देखील विचार करायला हवा की, तुमच्या देशात लोक तेव्हाच येथील जेव्हा तुमची ओळख स्थलांतरितांसाठी एक मित्र देश अशी असेल. सरकारने स्थलांतरितांबद्दल संकुचित विचार ठेवू नये.

याआधी सत्या नडेला यांनी भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल मत मांडले होते. ते म्हणाले होते की, जर एखादा बांगलादेशी शरणार्थी भारतात येऊन इन्फोसिसचा सीईओ झाला तर मला नक्कीच आवडेल. ही एक प्रेरणा देणारी गोष्ट हवी.

Leave a Comment