मनीष मल्होत्रा मुंबई पोलिसांच्या घोडदलाच्या युनिफॉर्मचा डिझायनर!


मुंबईत होणाऱ्या माऊंटेड हॉर्स यूनीटचा युनिफॉर्म फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मुंबई पोलिसांचा वर्षिक कार्यक्रम उमंग २०२० पार पडणार आहे. पोलिसांसाठी यासाठी खास युनिफॉर्म तयार करण्यात आला आहे. मुंबईचे नामांकित ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हे युनिफॉर्म डिझाईन केले आहे.

या खास युनिफॉर्म विषयी बोलताना मनीष म्हणाला, हा युनिफॉर्म म्हणजे एक शेरवानी असून ज्या शेरवानीच्या छाती आणि दंडावर धाग्याचे काम आहे. जे हाताने केले आहे. त्याचप्रमाणे खांद्यावर असणाऱ्या एपोलेटमुळे शाही लूक आला आहे. त्याचप्रामणे या युनिफॉर्मला मराठी योध्दाची जी खास पगडी असते त्यानुसार बनवण्यात आली आहे. ज्याच्या चारही बाजूला सोनेरी दोरे लावले आहेत. त्याचप्रमाणे पेहरावाच्या खालच्या बाजूला भारतीय खास ब्रीचेस लावण्यात आले आहेत. त्याचप्रामणे कमरेला असणारा लाल पट्टा शाही पोलिसांचा लूक आणत आहे. मनिष मल्होत्राला पोलिस आयुक्तांद्वारे या ५३ व्या उमंगसाठी खास आमंत्रण देण्यात आले आहे.

१९३२ साली मुंबईमध्ये माऊंटेड हॉर्स युनिट बंद करण्यात आले होते. पण आता शहरातील वाढती गर्दी बघता या युनिटची गरज भास लागली आहे. कारण गर्दीच्या हे युनिट ठिकाणी सहजरीत्या पोहचू शकते. ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. मुंबईत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोलिस युनिटची स्थापना केली जाणार आहे.

Leave a Comment