सौदीच्या प्रिन्सवर बेझॉस यांचा फोन हॅक केल्याचा आरोप

अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांचा मोबाईल फोन 2018 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे हॅक करण्यात आला होता. हा मेसेज सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याद्वारे वापरण्यात आलेल्या नंबरवरून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये एन्क्रिप्ट करण्यात आलेले मॅलेशियस फाइलचा समावेश होता. त्यानंतर बेझॉस यांच्या फोनमधील महत्त्वाचा डेटा चोरी झाला होता.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, जेफ बेझॉस आणि सौदी प्रिन्स दरम्यानच्या चर्चेत एक व्हिडीओ पाठवण्यात आला होता. या फाइलद्वारे बेझॉस यांच्या फोनमधील माहिती चोरी झाली होती. मात्र फोनमधून कोणती माहिती चोरण्यात आली होती व त्याचा कशासाठी उपयोग करण्यात आला होता, हे स्पष्ट झाले नाही.

माध्यमांमध्ये या संबंधित बातम्या प्रसारित झाल्यानंतर सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदिल अल –जुबेर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Leave a Comment