ट्रम्प यांना मारणाऱ्याला मिळणार 21 कोटींचे बक्षीस

अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ट ट्रम्प यांना मारणाऱ्याला 3 मिलियन डॉलर (जवळपास 21.35 कोटी रुपये) बक्षीस देण्याची घोषणा इराणच्या एका राजकीय नेत्याने केली आहे.

इराणचे खासदार अहमद हमजेह म्हणाले की, आम्ही ट्रम्प यांना मारणाऱ्याला 3 मिलियन डॉलरचा पुरस्कार रोख रक्कम स्वरूपात देऊ.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणच्या रेवोल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख कासिम सुलेमानी मारले गेले होते. त्यानंतर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. इराणचे नवीन जनरल इस्माइल गनी यांनी बदला घेण्याचा निश्चय केला होता.

आपल्या भाषणा दरम्यान हमजेह म्हणाले की, सुलेमानी यांची हत्या केल्याने अमेरिकेला आता धोका निर्माण झाला आहे. कारण इराणच्या लोकांना याचा बदला घ्यायचा आहे. अमेरिकेला वाटत होते की, कासिम अमेरिकेच्या लोकांना मारण्याचे षडयंत्र रचत आहे, म्हणूनच त्यांनी कासिम सुलेमानी यांना मारले.

ते पुढे म्हणाले की, या घटनेनंतर त्यांना वाटते का त्यांची लोक येथे सुरक्षित आहेत ? जर तुमचे दुतावास आमच्या निर्दोष लोकांना मारण्याचे षडयंत्र रचत असतील तर त्यांना नष्ट करण्याची परवानगी आम्हाला नाही का ?

2015 च्या आण्विक कराराबद्दल ते म्हणाले की, जर आज आपल्याकडे आज आण्विक शस्त्र असते, तर आपण या धोक्यापासून बचाव करू शकलो असतो. जर आज आपल्याकडे आण्विक शस्त्र असते, तर आपण धोक्यापासून लांब असतो.

Leave a Comment