6 लाखांपेक्षा कमी किंमतीची ह्युंडाईची शानदार कार लाँच

ऑटो कंपनी ह्युंडाईने आपली बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट सेडान कार ऑरा अखेर लाँच केली आहे. बीएस6 इंजिनसह येणाऱ्या या कारची किंमत 5.79 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.22 लाख रुपये आहे. कंपनीने अनेक व्हेरिएंटमध्ये ही कार लाँच केली आहे.

ह्युंडाई ऑरा फिअरी रेड, पोलर वाइट, तायफून सिल्लर, टायटन ग्रे, अल्फा ब्लू आणि व्हिनटेज ब्राउन या रंगात येईल. 2 जानेवारीपासून कारची प्री बुकिंग सुरू झाली होती. केवळ 10 हजार रुपयांमध्ये या कारची बुकिंग करता येते.

Image Credited – CarandBike

ह्युंडाई ऑराच्या लुकबद्दल सांगायचे तर याचा लूक ग्रँड आय10 निओसशी मिळता जुळता आहे. ऑराच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अँड्राईड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले सोबत 8 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 5.3 इंच डिजिटल स्पिडोमीटर, एमआयडी, वायरलेस चार्जर आणि प्रिमियम साउंड सिस्टम मिळत आहे.

Image Credited – CarWale

ही कार 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, 1 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.2 लिटर डिझेल इंजिन या पर्यायामध्ये येते.

ह्युंडाई ऑराचे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 83ps पॉवर आणि 114nm टॉर्क जनरेट करते. तर 1.0 लिटर टी-जीडीआय पेट्रोल इंजिन 100ps पॉवर आणि 172nm टॉर्क जनरेट करते. याच प्रमाणे 1.2 डिझेल इंजिन 75ps पावर आणि 190nm टॉर्क जनरेट करते. 1.2 लिटर पेट्रोल आणि डीजल इंजिन सोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्याय मिळेल. 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सोबत केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल.

Image Credited – NDTV

सिक्युरिटी फीचर्सबद्दल सांगायचे तर 2 एअरबॅग्स शिवाय वायरलेस चार्जिंग, रिअर एसी वेंट्स, एंटीलॉक ब्रेकिंग सिस्टमसोबत इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन, रिअर पार्किंग कॅमेरा आणि सेंसर्स फीचर्स देण्यात आलेले आहेत. कंपनीने यावर मल्टीपल वॉरंटी पर्याय दिले आहेत. ज्यात 3 वर्ष अथवा 1 लाख किलोमीटर, 4 वर्ष अथवा 50 हजार किलोमीटर आणि 5 वर्ष अथवा 4 हजार किलोमीटर हे पर्याय आहेत.

 

 

Leave a Comment