आगामी चित्रपटासाठी खिलाडी कुमारने घेतले तब्बल 120 कोटी


नेहमीच आपल्या कमाईमुळे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार चर्चेत असतो.अक्षय कुमारचे नाव 2019 मध्येही सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींमध्ये अव्वल स्थानी होते. त्याचे नाव जगातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्येही घेतले जाते. आता सातत्याने हिट चित्रपट देत असलेल्या अक्षय कुमारने आपल्या आगामी चित्रपटासाठी तब्बल 120 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची बातमी समोर येत आहे. या संदर्भात बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी चित्रपटासाठी (आनंद एल राय दिग्दर्शित) अक्षय कुमारने 120 कोटी रुपयांचा करार केला आहे. प्रभासने याआधी साहोसाठी 100 कोटी रुपये घेतल्याची चर्चा होती.

सध्याच्या घडीला अक्षय कुमार सातत्याने हिट चित्रपट देत असून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही उत्तम कामगिरी करत आहेत. लोक चित्रपट पाहायला फक्त अक्षय कुमारच्या नावामुळे येत आहेत. त्याचा परिणाम डिजिटल नेटवर्कवरही पडला आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमारचे मानधन देखील सातत्याने वाढत आहे. या 120 कोटींच्या करारामुळे आता अक्षय कुमार बॉलीवूडचा सर्वात महाग अभिनेता बनला आहे. पण या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नाही. अक्षयसोबत या चित्रपटात सारा अली खान आणि धनुषदेखील दिसू शकतात असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment