यामुळे मुख्यमंत्र्यांना पाहता आला नाही ‘तान्हाजी’


तान्हाजी: द अनसंग वॉरिअर या चित्रपटाने 2020 च्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवरवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने घसघशीत कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील या चित्रपटाची भुरळ पडली आहे. हा चित्रपट पाहण्यास ते स्वतः जाणार अशी चर्चा देखील होती. मुख्यमंत्री काल चित्रपट पहायला जाणार असल्याचे म्हटले जात होते, पण काही कारणांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. तरीही ते पुढील काही दिवसात हा चित्रपट पाहणार एवढे मात्र नक्की आहे.

काल मुंबईतील प्लाझा सिनेमा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी चित्रपटाचे एक खास स्क्रीनिंग करण्यात येणार होते आणि मुख्यमंत्री तिथे पोहोचले देखील. पण त्यांनी तिथे जाऊन फक्त ‘वाईल्ड मुंबई’ या चित्रफितीचा शुभारंभ केला असून ते तान्हाजी पाहण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितले की ते त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबतच हा चित्रपट पाहणार असल्यामुळे पुढील काहीच दिवसात ते नक्की हा चित्रपट पाहतील यात काही शंका नाही.

Leave a Comment