जगभरात कोट्यावधी शाळा आहेत. मात्र तुम्ही कधी जगातील सर्वात मोठी शाळा कोणती आहे असा कधी विचार केला आहे ?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ‘सिटी मोंटेसरी स्कूल’ ही केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी शाळा आहे. नर्सरी पासून ते 12 वी पर्यंतची ही शाळा जगभरात प्रसिद्ध आहे.

वर्ष 1959 मध्ये केवळ 5 विद्यार्थ्यांसह ही शाळा सुरू झाली होती. ही शाळा बनविण्यासाठी त्याकाळी केवळ 300 रुपये खर्च आला होता. या शाळेची स्थापना डॉ. जगदीश गांधी आणि डॉ. भारती गांधी यांच्याद्वारे करण्यात आली होती. ही शाळा आयसीसी बोर्डद्वारे मान्यता प्राप्त आहे.
लखनऊची सिटी मोंटेसरी शाळा केवळ जागेच्या बाबतीत नाही तर विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत देखील सर्वात मोठी शाळा आहे. वर्ष 2019 च्या गणनेनुसार, शाळेत 55,547 विद्यार्थी शिकतात. लखनऊ शहरातच या शाळेचे 18 कॅम्पस आहेत.

या शाळेत एकूण 4500 कर्मचारी आहेत. शाळेत सर्वाधिक 2,500 शिक्षक आहेत. विद्यार्थांच्या सुविधेसाठी 3,700 कॉम्प्युटर, 1000 वर्ग आहेत. या शाळेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नमूद आहे.

वर्ष 2005 मध्ये या शाळेने सर्वाधिक 29,212 विद्यार्थ्यांचा विक्रम केला होता. आधी हा विक्रम फिलिपाइन्सच्या मनीला येथील रिजाल हाय स्कूलच्या नावे होता. या शाळेत 19,378 विद्यार्थी होते.

भारताच्या या शाळेला 2002 मध्ये यूनेस्कोकडून पीस एज्यूकेशन पुरस्कार देखील मिळाला आहे. याशिवाय धर्मगुरू दलाई लामा यांत्यातर्फे ‘Hope of Humanity’ हा पुरस्कार मिळाला आहे.