२७ वर्षीय ४४४ किलो वजनी वेटलिफ्टरला हवी योग्य वधू


फोटो सौजन्य दै,भास्कर
पाकिस्तान मधील २७ वर्षीय वेटलिफ्टर अरबाब खिजर याच्यासाठी योग्य वधूचा शोध त्याचे कुटुंबीय घेत आहेत. अर्थात अरबाबला पुष्कळ वधूपित्यांकडून प्रस्ताव येत आहेत. पण आत्तापर्यंत त्याच्या आईवडिलांनी असे ३०० प्रस्ताव नाकारले आहेत. अरबाजसाठी कशी वधू हवी याच्या काही अटी आहेत आणि त्यात बसणारी वधू त्यांना अपेक्षित आहे.

त्याअगोदर अरबाबची माहिती जाणून घ्यायला हवी. तो वेटलिफ्टर आहेच पण त्याचे वजन ४४४ किलो असून उंची आहे ६ फुट ६ इंच. तो रोज १० हजार कॅलरीचा आहार घेतो आणि रोज नाश्त्याला ३६ अंडी खातो. त्याचे वजन ४४४ किलो असले तरी तो एकदम फिट आहे. त्याला कोणताही आजार नाही आणि जगातील सर्वात शक्तिशाली पुरुष असा लौकिक त्याला मिळवायचा आहे. किशोरावस्थेपासून त्याने वजन वाढवायला सुरवात केली असून त्याला पाकिस्तानात स्टार मानले जाते. त्याला काही जण पाकिस्तानी हल्क असेही म्हणतात. तो दोरीला बांधून ट्रॅक्टर खेचू शकतो.

अरबाबच्या आईवडिलांना त्यांच्यासाठी किमान १०० किलो वजन असलेली बायको सून म्हणून हवी आहे. तिची उंची किमान ६ फुट ४ इंच हवी आणि तिला उत्तम स्वयंपाक करता यायला हवा. आजपर्यंत त्यांनी ३०० मुली नाकारल्या आहेत.

अरबाब म्हणतो त्याच्या आईवडिलांना नातवंड पाहायचे आहे म्हणून त्याला लग्न करायचे आहे. त्याने दोरी बांधून ट्रॅक्टर ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि तेव्हापासून तो चर्चेत आला आहे.

Leave a Comment