परदेशात हळदीचे दुध पिण्याची क्रेझ वाढती


फोटो सौजन्य, जागरण
भारतात शतकानुशतके हळदीचा वापर घरोघरी केला जात आहे. पी हळद आणि हो गोरी अशी आपल्याकडे म्हण आहे. हळद घातलेले गरम दुध पिणे हा आपल्याकडचा एक हमखास सर्दी कमी करण्याचा उपाय. कफ, ताप, सर्दी, घसा दुखी यासाठी आयुर्वेदाने हळदीचा वापर सांगितला आहेच पण हळद रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी तसेच जखमा त्वरित भरून आणणारी आहे हे अनुभवातून सिद्ध झालेले आहे. लहान मुलांसाठी हळदीचे दुध हा रामबाण उपाय मानला जातो.


अशी ही आपली हळद आता परदेशी लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरली असून परदेशात हळद घातलेले गरम दुध पिण्याची क्रेझ वाढत चालल्याचे दिसून येत आहे. येथे असे दुध गोल्डन मिल्क नावाने विकले जात आहे. टर्मेरिक लट या नावानेही हे दुध लोकप्रिय आहे. अमेरिकेत एका संशोधनात हळद स्मरणशक्ती वाढविणारी, मधुमेहात फायदेशीर, रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारी, मूड चांगला बनविणारी, अल्झायमर, डिप्रेशन मध्ये सहाय्यकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय एक ग्लास गरम दुधात हळद घालून प्यायले तर हाडे बळकट होणे, वजन कमी होणे, लिव्हर फॅट, कोलेस्टेरॉल कमी होणे, सूज कमी होणे असे फायदे दिसतात.

हळद रक्त साफ ठेवणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आहेच. तसेच चेहरा चमकदार बनविणे आणि अॅलर्जी कमी होण्यात सहाय्यकारी आहे. यामुळे आजकाल परदेशात विविध रेस्टॉरंट, हॉटेल्स मधून हळदीचे दुध विकले जात आहे आणि ग्राहकांनी त्याला चांगली पसंती दिली आहे असे दिसून येत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment