तृतीयपंथियांना अनेक कंपन्यातून नोकऱ्यांंची संधी


फोटो सौजन्य इंडिअन एक्सप्रेस
भारतातील अनेक नामवंत कंपन्या तृतीयपंथियांना नोकऱ्यात समाविष्ट करून घेण्यास पुढे सरसावल्या असल्याचे दिसून आले आहे. केपीएमजी, इन्फोसिस, अॅक्सेंजर, नेस्ट अवे, सोडेक्सो अश्या अनेक कंपन्या त्यात सहभागी आहेत. या कंपन्यांनी तृतीयपंथियांचा नोकरी क्षेत्रात सुलभ प्रवेश व्हावा यासाठी त्यांची धोरणे आणि नियम बदलले आहेत. पेरीफेरी स्टार्टअप कंपनी या कंपन्यांना तृतीयपंथिय टॅलेंट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना त्यात चांगले यश मिळाले आहे.

पेरीफेरीचे सीओओ निशांत अग्रवाल या संदर्भात म्हणाले, आमच्या अंदाजाप्रमाणे देशात किमान १ कोटी तृतीयपंथी आहेत. त्यातील ५ लाख कायम नोकरीत आहेत. या लोकांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात, त्यांच्याशी वर्तणूक करताना भेदभाव केला जातो, समाजात त्यांच्याविषयी चुकीचे समज असतात. ही सारी आव्हाने त्यांना पेलावी लागतात. या समाजात अनेक हुशार आणि गुणी लोक आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले तर तेही सर्वसामान्य माणसाप्रमाणे कंपनीत काम करू शकतात. ही स्टार्टअप दोन वर्षापूर्वी सुरु झाली आणि आत्तापर्यंत १२५ तृतीयपंथियांना त्यांनी नोकरी मिळवून दिली आहे.

या नोकऱ्या घरकाम करण्यापासून ते प्रोग्रामिंग, व्हाईस प्रेसिडेंट इतक्या विविध ठिकाणी आहेत. प्रोटेक्शन ऑफ राईट्स अॅक्ट २०१९ प्रमाणे त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. तरीही त्यांच्यासाठी एकदम कंपनीत जाऊन अन्य कर्मचाऱ्यात मिसळणे फार सोपे नाही. त्यासाठी सातत्याने त्यांना पाठींबा देण्याची गरज आहे.

टाटा स्टील मध्ये २५ तृतीयपंथी काम करत आहेत तर कोची मेट्रोने नुकतीच २३ तृतीयपंथियांची भरती केली आहे.

Leave a Comment