तुम्ही नटवर लाल व त्याचे फसवणुकीचे कारनामे अनेकदा ऐकले असतील, मात्र आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याच्या फसवणुकीच्या बाबतीत आजुबाजूला देखील कोणी नव्हते. या व्यक्तीने एकदा नाही तर तब्बल दोनदा जगप्रसिद्ध आयफेल टॉवर विकण्याचा प्रयत्न केला होता. 5 भाषा बोलणाऱ्या या व्यक्तीला 47 नावांनी ओळखले जायचे. यामध्ये विक्टर लुस्टिग, चार्ल्स ग्रोमर, अलबर्ट फिलिप्स, रॉबर्ट जॉर्ज वेग्नर या नावांचा समावेश होता. या महाठगाचे खरे नाव काय होते, हे कोणालाच माहिती नाही.
अनेक दशके हा ठग तपास यंत्रणांच्या निशाण्यावर होता. अमेरिकेच्या एफबीआयने त्याला विक्टर लुस्टिग म्हटले आहे. मात्र हे देखील त्याचे खरे नाव नाही. ब्रिटिश पत्रकार जैफ मेशने त्याच्या किस्स्यांवर हँडसम डेव्हिल नावाचे पुस्तक लिहिले आहे. जैफ सांगतात की, जेव्हा ही तो एफबीआयपासून वाचून पळत असे, तेव्हा तो आपला पाठलाग करणाऱ्या अधिकाऱ्यांची खिल्ली उडवण्यासाठी त्यांच्या नावाने हॉटेल्सच्या रुम बुक करत असे आणि त्यांच्या नावाने जहाजांवर प्रवास करायचा. एफबीआयच्या कागदपत्रांनुसार, 1 ऑक्टोंबर 1890 ला होस्टाइन येथे त्याचा जन्म झाला होता.

अमेरिकेतील 1920 चे दशक गँगस्टर अल कपोनी आणि जॅजसाठी ओळखले जाते. त्यावेळी प्रथम विश्वयुद्ध समाप्त झाले होते व अमेरिका प्रगतीच्या दिशेने होती. त्याचवेळी अमेरिकेच्या 40 शहरातील हेरांनी या महाठगाला अल सिट्रोज हे निकनेम दिले. सिट्राज एक स्पॅनिश शब्द आहे व याचा अर्थ जख्म असा होतो. हे नाव त्याला त्याच्या डाव्या गालावर असलेल्या जख्मेच्या खुणामुळे मिळाले होते.
वर्ष 1925 ला विक्टर लुस्टिंग मे महिन्यात पॅरिसला पोहचला होता. लुस्टिंगने पॅरिसमधील एका लग्झरी हॉटेलमध्ये मेटल वेस्ट इंडस्ट्रीच्या (भंगार) मोठ्या उद्योगपतींशी भेटीचे आयोजन केले. यासाठी लुस्टिंगने स्वतःला फ्रान्स सरकारचा अधिकारी सांगत सरकारी स्टॅम्पसह पत्र पाठवले.

लुस्टिंग या भेटीत म्हणाला की, इंजिनिअरिंग बाबतीत काही अडचणी, तसेच राजकीय व आर्थिक बाबींमुळे आयफेल टॉवर पाडणे आवश्यक आहे. तो पुढे म्हणाला की, टॉवर सर्वाधिक बोली लावणाऱ्याला दिला जाईल. बैठकीत उपस्थित सर्वांना वाटले की, हे फ्रान्स सरकारचे एक पाऊल आहे. त्यामुळे कोणीच यावर प्रश्न निर्माण केले नाही. त्याने एकदा नाही तर दोनदा असे केले.
विक्टर लुस्टिंगने आपल्या आयुष्यात असे अनेक विचित्र कारनामे केले आहे. कारागृहातून पळून जाणे त्याच्यासाठी एकदमच सोपे होते. मात्र अखेर अमेरिकेच्या सरकारने त्याला पकडून अल्काट्रॉज जेलमध्ये ठेवले. तेथेच 11 मार्च 1947 ला निमोनियाने त्याचा मृत्यू झाला.