मौजमजा करण्यासाठी ही कंपनी देत आहे दणदणीत पगार

जर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आणि पार्ट्या करण्याची आवड असेल तर यूकेची एक कंपनी तुमच्या शोधात आहे. ही कंपनी तुम्हाला फिरणे व पार्टीमध्ये जाण्यासाठी वर्षाला तब्बल 16 लाख रुपये पगार देईल. सोबतच तुमच्या प्रवासाचा व राहण्याचा खर्च देखील उचलेल.

यूकेची कंपनी गोहेन प्रोफेशनल पार्टी टेस्टरच्या शोधात आहे. या जॉबसाठी कंपनी अशा व्यक्तीच्या शोधात आहे जी जगभराच फिरू शकेल, वेगवेगळ्या हॉटेल्स, क्लब्समध्ये जाईल आणि ब्राइड्सला (वधू) पार्टी करण्यासाठी नवनवीन आयडिया शोधेल.

सोबतच यासाठी त्या व्यक्तीला वधुसाठी पार्टीचे आयोजन करण्यास मदत करणे, त्यांचा स्पेशल दिवस खास बनवणे अशा गोष्टी कराव्या लागतील. या नोकरीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रोफेशनल पदवीची गरज नाही. मात्र कंपनी पार्टी करण्यास आनंद येत असेल, एडव्हेंचर आवडत असेल व इव्हेंट मॅनेजमेंटचा अनुभव असलेल्या उमेदवाराच्या शोधात आहे.

कंपनी या कामासाठी वर्षाला 17,000 पाउंड (जवळपास 15.7 लाख) पगार देत आहे. सोबतच तुमचा सर्व खर्च देखील करेल. तुम्ही देखील या नोकरीसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही कंपनीची अधिकृत वेबसाईट www.gohen.com ला भेट देऊ शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2020 आहे.

Leave a Comment