‘या’ पठ्ठ्याला पार्टी करण्यासाठी मिळतो करोडोचा पगार


नवी दिल्ली: मोठ-मोठ्या सेलिब्रेटींसोबत राहणे, महागतील महाग शेंपेन पिणे आणि खासगी विमानातून दुनियेची सैर करने आपल्यापैकी बहुतेकांसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. पण एका मनुष्यासाठी ही रोजची बाब आहे. या व्यक्तीसाठी दररोज पैसे कमविण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणजे, जेवढ्या पार्ट्या तेवढा पैसा.

होय, आम्ही तुम्हाला इंग्लंडमधील लिसीस्टर सिटीच्या बल्ली सिंगबाबत सांगत आहोत. जे कोट्यवधीची इव्हेन्ट कंपनी चालवतात. त्याला समृद्ध आणि प्रसिद्ध लोकांसाठी पार्टीचे आयोजन करण्याकरिता कोट्यावधी रूपये मिळतात. ४२ वर्षीय बल्ली यांना ”द मोस्‍ट इंटरेस्‍टिंग मॅन इन इंडिया” (भारतातील सर्वात मनोरंजक अशी व्यक्ती)ची उपाधी देखील मिळाली आहे. जगातील प्रसिद्ध आणि मोठ्या कंपन्या त्याचे ग्राहक आहेत. एवढेच नव्हे बल्ली आपल्या घड्याळ्याला शॅम्पेनने धुण्यासाठीही प्रसिद्ध आहे आणि त्या शॅम्पेनची किंमत देखील थोडीथोडकी नाही, ज्या शॅम्पेनने बल्ली आपले घड्याळ धुतो त्याची किंमत १७ लाख रुपये ऐवढी आहे. दिवसा आणि रात्री पार्ट्यांचे आयोजन करीत असतानाही बल्ली दारूच्या एका थेंबाला देखील स्पर्श करीत नाही.

बल्लीकडे पैशाची कमतरता नाही तेव्हाच त्याने एकाच आठवड्यात दोन फेरारी केल्या आणि त्यासुद्धा बँक बॅलेन्सची तपासणी न करता. हे काम साध्य करणे त्यांना सोपे नव्हते तरीसुद्धा हे त्यांचे मूळ मुळशी जोडून आहेत. अरबोपती होण्याआधी बल्ली लिसिस्‍टरमध्ये वडिलांच्या कापड कारखान्यात काम करत होता, परंतु ती स्वतःची ओळख बनवायची होती. लहान वयाच्या १६ व्या वर्षी जेव्हा मुले मजा आणि खेळण्यास आवडतात तेव्हा बल्ली स्वत:चे नाईट क्लब चालवत होता.

बल्लीला मोठा ब्रेक तेव्हा मिळाला जेव्हा प्रसिद्ध गायक सिस्को आपल्या यूके दौ-या दरम्यान एक रात्र अविस्मरणीय बनवू इच्छित होता. एका मित्राने सिस्को बल्ली विषयी सांगितले की ते हे काम अधिक चांगले करू शकतात. यानंतर बल्लीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक सेलिब्रेटींसाठी ऑर्डर मिळविणे प्रारंभ केले. २००९ साली त्यांनी ‘रिच लिस्ट’ नावाची कंपनी उघडली. त्याची कंपनी पार्टी आणि कार्यक्रम आयोजनासाठी खूप प्रसिद्ध होत होती. संपूर्ण युनायटेड किंग्डममधून त्यांना मोठमोठ्या ऑर्डर मिळत होत्या. त्यांच्या कंपनीने २०१२मध्ये दुबईत अबु धाबी रेस विकेंड इव्हेंटचे आयोजन केले. बल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ८ कोटी रुपये घेतो. आतापर्यंतची त्याची सर्वात महाग ऑर्डर १७० कोटी रुपयांची होती. त्याने जे दुबईतील एका खाजगी बेटात आयोजित कार्यक्रमासाठी घेतले होते.

Take us back 🙏🏾 @asanmatas

A post shared by Bally Singh (@richlist_bally) on


तथापि, आपण असे म्हणू शकतो की आपल्याला बल्लीच्या नशिबाचा हेवा वाटत असला तरीही आपल्या खूप सोपे वात असेल, पण बल्ली यांनी हे कार्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. ते म्हणतात की कठोर परिश्रम आणि प्रमाणबद्धतेसाठी कोणतेही पर्याय नाहीत.

Leave a Comment