‘भूल भुलैय्या २’मध्ये असणार मुळ चित्रपटातील २ गाणी


2007 साली आलेल्या अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहुजा यांच्या ‘भूल भुलैय्या’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बज्मी केले होते. काही प्रेक्षक हा चित्रपट आजही आवडीने पाहतात. त्याचबरोबर या चित्रपटात अक्षय कुमारसह परेश रावल, अमिषा पटेल यांसोबतच इतरही बरेच कलाकार दिसले होते. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वेलचे दिग्दर्शन अनिस बज्मी हेच करणार असून यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीची मुख्य भूमिका असणार आहे.

या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. अक्षय कुमारप्रमाणेच लुक या पोस्टरमध्ये कार्तिकचा पाहायला मिळाला. पण यावेळी चित्रपटाची कथा पूर्णत: वेगळी असल्याचे दिग्दर्शक अनिस बज्मी यांनी म्हटले आहे. त्यांनी या गोष्टीचा उलगडा एका माध्यमाशी बोलताना केला आहे.

राजस्थानमध्ये या चित्रपटाचा बराच भाग चित्रीत करण्यात आला आहे. तर, काही दृश्यांचे चित्रीकरण हे मुंबईमध्ये झाले आहे. आता जयपूर आणि पुन्हा राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या उर्वरीत भागाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. ‘भूल भुलैय्या’चा अनेकांना हा चित्रपट सिक्वेल वाटतो. पण, हा सिक्वेल नसून या चित्रपटाची कथा वेगळी आहे. यामध्ये फक्त मुळ चित्रपटातील दोन गाण्यांचा समावेश राहणार असल्याचे अनिस यांनी सांगितले आहे. या चित्रपटात तब्बुची खास भूमिका पाहायला मिळणार आहे. कार्तिक आर्यन आणि कियाराने याबाबत माहिती दिली होती.

Leave a Comment