भारतीय लष्कराच्या तीनही प्रमुखांनी एकत्र पाहिला तान्हाजी


सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा तान्हाजी- द अनसंग वॉरिअर चित्रपट तुफान गाजत आहे. त्यातच या चित्रपटाने एक इतिहास देखील रचला आहे. भारतीय लष्कराच्या तीनही प्रमुखांनी हा चित्रपट एकत्र पाहिला आहे..


याबाबतची माहिती देताना निवृत्त नौदल अधिकारी हरिंदर सिक्का यांनी ट्विट करत सांगितले की, तानाजीने इतिहास रचला. अजय देवगण आणि काजोल यांचा तान्हाजी- द अनसंग वॉरिअर हा चित्रपट नौदल, वायूदल आणि भूदलाच्या प्रमुखांनी एकत्र पाहिला. हा चित्रपट तिघांनी दिल्लीमध्ये पाहिला. तुम्ही देखील हा चित्रपट नक्की पाहा.

त्याचबरोबर अजय देवगणचा तीन प्रमुखांसोबतचा फोटो सिक्का यांनी ट्विटरवर शेअर केला. अजयने हेच ट्विट शेअर करत लिहिले की, तीन प्रमुखांसोबत घालवलेली संध्याकाळ माझ्यासाठीचा सन्मान होता. तान्हाजीवर भरभरून प्रेम करण्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. १५० कोटींचा आकडा चित्रपटाने पार केला असून चित्रपटाने आतापर्यंत १६७.४५ कोटींची कमाई केली आहे.

Leave a Comment