अंडे तुमचे रक्षण करेल मधुमेह होण्यापासून


आजच्या घडीला कमी वयातच कित्येक लोकांना मधुमेह म्हणजे डायबेटीजचा त्रास होऊ लागला आहे. पण तुम्हाला जर अंडे खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तसे तर अंडे नेहमी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. पण ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्य़ूट्रीशन’मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, एका आठवड्यात चार अंडे ज्या पुरूषांनी खाल्ले तर त्यांना टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता आठवड्यातून एकच अंड खाणा-या पुरूषापेक्षा ३७ टक्क्यांनी कमी होते.

जगभरात टाइप-२ मधुमेह चांगला वेगाने पसरत असून वर्ष १९८४ ते १९८९ च्या मधील ४२ ते ६० वयोगटातील २,३३२ वयोवृद्ध लोकांच्या खाण्या-पिण्याच्य सवयींचे पूर्व फिनलंड विश्वविद्यालयातील संशोधकांनी मूल्यांकन केले. त्यानंतर १९ वर्ष यांचा फालोअप घेतल्यानंतर ४३२ लोकांना टाइप-२ मधुमेह झाल्याचे माहिती पडले. अभ्यासातून समोर आले की, अंड्याचे सेवन केल्याने टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता आणि रक्तात ग्लुकोज स्तर कमी झाला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment