सैफ अली खानचा भारताच्या इतिहासात इंग्रजांना मोठे करण्याचा प्रयत्न


अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. पण काहींनी या चित्रपटात दाखवलेल्या इतिहासासोबत छेडछाड करण्यात आल्याचाही आक्षेप नोंदवला आहे. याच दरम्यान एका मुलाखतीत बोलताना सैफ अली खानने तान्हाजी हा ऐतिहासिक चित्रपट नसून भारत ही संकल्पना इंग्रज येण्याआधी नसल्याचे वक्तव्य विधान केले.

भाजप आमदार राम कदम यांनी सैफ अली खानच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. इतिहासबाबत अभिनेता सैफ अली खान याचे ज्ञान कमी आहे. 1000 वर्षांपुर्वीचा भारताचा इतिहास असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. सैफ अली खान एक उत्तम अभिनेता असून इतिहासाचे अपूर्ण ज्ञान घेऊन तो बोलत आहे. हजार वर्षांपूर्वीचा भारताचा इतिहास आहे. त्याला याची माहिती नसावी, असे राम कदम म्हणाले.

राम राज्यापासून त्याने भारतीय इतिहासाची सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात येईल की जग भारत देशाला का मानत आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य करून सैफ अली खान यांनी भारतीय इतिहासाला खाली दाखवत इंग्रजांना मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दुर्दैवच असल्याची प्रतिक्रिया आमदार राम कदम यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment