आता ‘माय जिओ’द्वारे करता येणार पैशांची देवाण-घेवाण

रिलायन्स जिओने जिओ मार्ट लाँच केल्यानंतर आता यूनिफाइड पेमेंट इंटरफेसमध्ये (यूपीआय) एंट्री घेतली आहे. रिलायन्स जिओने आपल्या माय जिओ अ‍ॅपमध्ये यूपीआय पेमेंट सपोर्ट दिले आहे. मात्र हे फीचर सध्या मोजक्याच युजर्सला मिळत आहे.

रिपोर्टनुसार, या अ‍ॅपमध्ये व्हर्च्युअल पेमेंट एड्रेस (व्हीपीए) आणि यूपीआय आयडी जोडण्याचा पर्याय मिळत आहे.

ट्विटर एका युजरने देखील जिओ अ‍ॅपच्या यूपीआय पेमेंट फीचरचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. माय जिओ अ‍ॅपकडून युजर्सला यूपीआय आयडी मागण्यात येत आहे. त्यानंतर युजर्सला मोबाईल नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि बँक अकाउंटची माहिती द्यावी लागत आहे. साइनइन केल्यानंतर जिओ अ‍ॅप देखील अन्य यूपीआय पेमेंट अ‍ॅप जसे की गुगल पे आणि फोन पे प्रमाणे दिसत आहे. मात्र अद्याप जिओकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सध्या जिओच्या ग्राहकांची संख्या 37 कोटी झाली असून, मागील 12 महिन्यात 13 कोटी 57 लाख ग्राहक जिओशी जोडले गेले आहेत. तर 1 कोटी 48 लाख ग्राहक मागील तिमाहीत जोडले गेले. जिओच्या या पेमेंट सेवेमुळे आता गुगल पे, फोन पे सारख्या यूपीआय पेमेंट सर्विसला टक्कर मिळणार आहे.

Leave a Comment