घरबसल्या एका क्लिकवर असा बदला आधार कार्डवरील पत्ता

आधार कार्ड हे आज प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा म्हणून अनिवार्य झाले आहे. याचा वापर बँक, रेशन, गॅस प्रत्येक गोष्टीसाठी होतो. अनेकदा मात्र आधार कार्डमधील चुकांमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. आधार कार्डमधील पत्ता चुकीचा असल्याने समस्या निर्माण होती. मात्र आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सहज नवीन पत्ता अपडेट करू शकता.

Image Credited – Amar ujala

आधारमध्ये नवीन पत्ता अपडेट करण्यासाठी सर्वात प्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जावे. येथे तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस पर्याय दिसेल. ज्यामध्ये तुम्हाला अपडेट हा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला एड्रेस अपडेट रिक्वेस्ट (ऑनलाइन) वर क्लिक करावे लागेल.

Image Credited – Amar ujala

यानंतर तुमच्या समोर एक नवीन टॅब उघडेल. आधार कार्डमधील पत्ता अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. कारण याच नंबरवर आधार अपडेट ओटीपी येईल.

Image Credited – Amar ujala

आधार नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करा.

Image Credited – Amar ujala

ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पत्ता बदलण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या समोर आधार अपडेट पर्याय दिसेल. नवीन पत्ता टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.

Image Credited – Amar ujala

डेटा अपडेट रिक्वेस्टनंतर तुम्हाला काही कागदपत्रे देखील द्यावी लागतील. ज्यामध्ये पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, बँक पासबूक, पोस्ट ऑफिस अकाउंट पासबूक, रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्राचा समावेश आहे. या कागदपत्रांवर तुमची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. याचे फोट तुम्हाला साइटवर अपलोड करावे लागतील. वरील पैकी केवळ एकच कागदपत्र तुम्हाला द्यावे लागेल.

Image Credited – Amar ujala

यानंतर तुम्ही आपल्या जवळच्या बीपीओ सर्व्हिस प्रोव्हाईडरला निवडू शकता. तुम्हाला एक अपडेट रिक्वेस्ट नंबर येईल. या नंबरच्या मदतीने तुम्ही रिक्वेस्टची एक कॉपी डाउनलोड अथवा प्रिंट करू शकता. रिक्वेस्ट सबमिटनंतर काही दिवसानंतर तुमचा नवीन पत्ता अपडेट होईल. तुम्हाला याबाबत ईमेल अथवा मोबाईल नंबरवर नॉटिफिकेशन देखील येईल.

Leave a Comment