स्क्रीनशॉट न काढता असे करा व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स डाउनलोड

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी अनेक खास फीचर्स आणले आहेत. यातील एक खास फीचर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स. या फीचरद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो आणि व्हिडीओज स्टेट्स म्हणून ठेवता येतात. मात्र अनेकदा आपल्याला दुसऱ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स हवे असते, मात्र ते डाउनलोड करता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहज व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स डाउनलोड करू शकाल.

Image Credited – Amar ujala

कोणत्याही युजर्सचे स्टेट्स डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला फोनमध्ये स्टेट्स डाउनलोडर फॉर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपला गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करावे लागेल.

Image Credited – Amar ujala

अ‍ॅपमध्ये तुम्हाला क्लिक टू चॅट आणि स्टेट्स डाउनलोडर असे पर्याय दिसतील.

Image Credited – Amar ujala

स्टेट्स डाउनलोडर पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला सर्व युजर्सनी स्टेट्स म्हणून शेअर केलेले फोटो व व्हिडीओ दिसतील. त्यानंतर तुम्हाला हवा असलेले फोटो अथवा व्हिडीओ तुम्ही त्यावर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

Image Credited – Amar ujala

तुम्ही डाउनलोड केलेले स्टेट्स फाइल मॅनेजरमध्ये स्टेट्स डाउनलोडर फोल्डरमध्ये जाऊन स्टोर होतील.

Leave a Comment