चक्क एव्हरेस्टवर होणार फॅशन शो

पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाविषयी लोकांना जागृक करण्यासाठी पहिल्यांदाच माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर 5,644 मीटर उंचीवर आंतरराष्ट्रीय फॅशन शो भरणार आहे. 26 जानेवारीला होणाऱ्या या फॅशन शोमध्ये मॉडेल्स मायन्स 40 डिग्री व 25 टक्के ऑक्सिजनमध्ये रॅम्प वॉक करतील.

यावेळी अशा कपड्यांचा व बुटांचा वापर केला जाईल, जे काही महिन्यातच पुर्णपणे विरघळेल. आयआयटी दिल्लीच्या मदतीने तयार करण्यात आलेला वॉटर लेस स्प्रेच्या मदतीने जवळपास 8 हजार लीटर पाण्याची बचत होईल. हा फॅशन शो नेपाळ आणि भारताने मिळून आयोजित केला आहे.

निवडण्यात आलेल्या 17 मॉडेल्सला कार्यक्रम स्थळावर पोहचण्यासाठी 140 किमीची चढाई करावी लागेल. ही चढाई 19 जानेवारीपासून सुरू झाली असून, सर्व मॉडेल्स दररोज 7 तास चढाई करून 19 किमी अंतर पार करत आहेत. जेणेकरून 25 जानेवारीला कार्यक्रम स्थळावर पोहचता येईल. या सर्व मॉडेल्सला मसल्स क्रॅम्प, अल्टीट्यूड सिकनेस, वेगाने न चालणे, कार्डियो यासारख्या 18 प्रकारची ट्रेनिंग देण्यात आलेली आहे.

शोचे आयोजक भारताचे डॉ. पंकज गुप्ता आणि नेपाळचे रीकेन महाजन यांनी सांगितले की, सर्वात उंचावर होणाऱ्या या शोचा विक्रम नोंदवण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीम देखील उपस्थित असेल. चढाई करताना प्रत्येक मॉडेल कचरा जमा करत आहे. प्रायोजकांनी प्रत्येक मॉडेलवर 10 लाख रुपये खर्च करून नवीन प्रकारचे कपडे तयार केले आहेत.

शोच्या सर्व मॉडेल्सला एक खास डिव्हाईस देखील देण्यात आलेले आहे. जे ट्रॅकिंग दरम्यान कार्बन उत्सर्जन मोजेल. मॉडेल्सने घरातून निघाल्यापासून ते एव्हरेस्टची चढाई आणि काठमांडू विमानतळावर पोहचेपर्यंत जेवढे कार्बन उत्सर्जन केले आहे, त्यानुसार त्यांना झाडे लावावी लागतील. ही झाडे भारताच्या पुद्दुचेरी येथील ओरोविले संस्थेकडून दिली जातील.

Leave a Comment