फेसबुकवर या चुका केल्यास अकाउंट होईल ब्लॉक

आज सोशल मीडियाचा वापर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण करत आहेत. सोशल मीडियावर युजर्स आपली खाजगी माहिती देखील शेअर करत असतो. मात्र यामुळे तुमचे फेसबुक अकाउंट देखील ब्लॉक होऊ शकते. फेसबुकवर काय शेअर करू नये, याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amar ujala

धमकी देणे अथवा एखाद्याच्या विरोधा पोस्ट –

फेसबुकव तुम्ही एखादी व्यक्ती, समूह अथवा स्थानाबद्दल हिंसा पसरवण्याच्या दृष्टीने काहीही लिहू शकत नाही. तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून कोणालाही थेट धमकी देऊ शकत नाही. कोणाला पैसे मागणे अथवा शस्त्र विकणे अथवा ते खरेदी करण्यास सांगू शकत नाही.

Image Credited – National Review

दहशतवादी कारवाया –

कोणतीही दहशतवादी कारवाई, संघठित होऊन हिंसा पसरवणे, सामूहिक हत्या, मानवी तस्करी अशा घटनांमध्ये सहभागी समूह, नेते अथवा लोकांचे समर्थन, कौतूक करणाऱ्या पोस्ट देखील फेसबुक त्वरित हटवते. तक्रार केल्यास अकाउंट अथवा पेज ब्लॉक देखील होते. कोणत्याही गैर कायदेशीर, हिंसक अथवा सरकारच्या विरोधात कारवाई करणाऱ्या संघटनेत सहभागी झाल्यास अकाउंट ब्लॉक होते.

Image Credited – Amar ujala

प्रतिबंधित वस्तूंची खरेदी व विक्री –

फेसबुकवर पावती नसलेल्या औषधांची विक्री, फार्मास्यूटिकल औषधे, गांजा खरेदी-विक्री करण्यास बंदी असते. याशिवाय शस्त्रास्त्रची खरेदी-विक्री, भेट देणे या गोष्टींना देखील बंदी आहे.

Image Credited – Amar ujala

गुन्ह्याला प्रोत्साहन देणे व त्याचा प्रचार करणे  –

फेसबुक हिंसक गुन्हे, चोरी, फसवणूक अशा गोष्टींना प्रोत्साहन अथवा त्याचा प्रचार करणाऱ्यांना बॅन करते. प्राण्यांना त्रास देणे, त्यांचा बळी देणे, शिकार करणे, त्यांचे अवयव विकणे, प्राण्यांची लढाई, तस्करी अशा घटनांशी संबंधित अकाउंटला देखील फेसबुक ब्लॉक करते.

Image Credited – Amar ujala

नुकसान –

लोकांना, व्यावसायांना अथवा प्राण्यांना नुकसान पोहचवणे व तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर देखील फेसबुक कारवाई करते. मात्र तुम्ही जेवणासाठी कोंबडी कापत असाल तर फेसबुकला त्यावर काहीही अडचण नाही.

Leave a Comment