219 वर्षात प्रथमच सिद्धिविनायकाच्या चरणी एवढे किलो सोने

दिल्लीच्या एका भाविकाने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला तब्बल 35 किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किंमत 14 कोटी रुपये आहे. मंदिराच्या 219 वर्षांच्या इतिहासात एवढे सोने एखाद्या भाविकाने दान केल्याची पहिलीच वेळ आहे. 15 जानेवारी ते 19 जानेवारी असे मागील 4 दिवस शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद होते.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले की, दानात मिळालेल्या या सोन्याचा वापर मंदिराचे दरवाजे, छत आणि घुमटावर केला जाईल. बांदेकर यांनी सोने दान केलेल्या व्यक्तीचे नाव सांगितले नाही.

बांदेकर यांनी सांगितले की, 2017 मध्ये एकूण 320 कोटी रुपये दान मिळाले. 2019 मध्ये ही रक्कम वाढून 410 कोटी रुपये झाले. दानात मिळालेल्या या रक्कमेचा मोठा हिस्सा गरजूंच्या मदतीसाठी वापरला जातो.

Leave a Comment